गोंदिया,दि.18ः- देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसहिंता लागू झालेली आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही 11 एप्रिलला मतदान पार पडले.या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचाराच्या सभेसाठी आलेले भाजपचे नेते नितिन गडकरी हे आले असता त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व अर्जुनी मोरगावचे आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनी स्वागत फलक लावले.हे स्वागतफलक नवेगावबांध टी-पाईंटवर विद्युत खांब क्रमांक 320 वर तसेच रस्त्यालगतच्या झाडावर हार्दिक अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते.आचारसहिंता भंग केल्यामुळे भरारी पथकाचे विजय भैय्यालाल साखरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याचे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment