Thursday, 4 April 2019

मोदींच्या प्रचारसभेला जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात,7 जखमी

गोंदिया,दि.03ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा गोंदिया येथे आज आयोजित करण्यात आली आहे. यासभेला येण्यासाठी तिरोडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे चारचाकी सुमो वाहनाने येत असतांना त्यांच्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन 7 कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली.
बोपेसर येथून टाटा सूमो MH34 K5603 ने हे येत असताना गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत किंडगीपारजवळ  हा अपघात घडला.जखमीमध्ये बोपेसर येथील गणराज रहांगडाले, महादेव भेलावे, धनराज भेलावे यांचा समावेश असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.यापुर्वी गोंदिया येथील चौकीदार कार्यक्रमासाठी येत असलेल्या दोन भाजप कार्यकर्त्यांचा रविवारला अपघाती मृत्यू झाला होता.या घटनामुळे मोंदीची ही सभाच भाजप उमेदवाराला अपशकुनी ठरणार अशी चर्चा सुरु झाली आहे.यापुर्वी गोंदियात 2014 च्या निवडणुकीत सुध्दा मोदी प्रचाराला आले असता भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...