गोंदिया,दि.04 – गोंदिया येथील नवीन बायबास मार्गावरील लोकसभा निवडणुकीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला बुधवारला रात्री रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अपघात झाल्याने यामध्ये ११ पोलीस जखमी झाले आहेत.
जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गोंदिया-आमगाव मार्गावर घडली.या बसमध्ये पुणे येथील गृप-डी चे पोलीस कर्मचारी होते.जखमीपैकी ४ ते ५ पोलीस गंभीर असल्याने त्यांना डाॅ.बजाज यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात बुधवारी पंतप्रधान मोदींची सभा होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री सभा संपल्यानंतर पोलीस ठाण्याकडे परतत असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गोंदिया ते आमगाव रस्त्यावर अचानक बस उलटली. या बसमधून जवळपास २६ ते २७ पोलीस कर्मचारी प्रवास करत होते.
No comments:
Post a Comment