Tuesday 16 April 2019

जंगलात आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

मोहाडी,दि.16ः-एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान सुरू असताना आंबागड किल्ल्यालगत असलेल्या जंगलातील पहाडीवर एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली असून ती महिला कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेनंतर विविध चर्चांना उधान आले असून परिसरात भितीचे वातावरण कायम आहे.
पोलीस विभागाच्या नोंदीनुसार, सन २0१८ मध्ये ७४ तर २0१९ मध्ये ४८ महिला बेपत्ता आहेत. ती महिला या बेपत्ता महिलांमधील तर नसावी ना? असा अंदाज बांधला जात आहे. पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात महिलेची शोध पत्रिका पाठवूनही अद्यापही तिची ओळख पटली नाही. ती महिला पहाडीवर चढली कशी? ती एकटी होती की तिच्यासोबत अन्य कुणी होते? परिसरातीलच लोकांची तर तिला पहाडीवर नेले नसावे, ती दगडावर झोपलेल्या अवस्थेत का होती, बाहेर जिल्ह्यातून खून करून तर तिला आणले तर नसावे ना? अशा अनेक चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. या अनोळखी महिलेच्या शवविच्छेदन अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आंधळगावचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे संपूर्ण जंगल पिंजून काढत आहे. सदर महिलेची उंची ५ फूट २ इंच असून दोन्ही हात पसरले होते. तसेच तिच्या डोक्याखाली शाल, गळ्यात पिवळ्या रंगाची १२ मनी व एक डोरला, हिरव्या मेहंदी रंगाची साडी, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दगडावर आढळून आला होता. तिचे वय ४५ वर्षे आहे. महिलेचा मृत्यू घटना उघडकीस आल्याच्या ७ ते ८ दिवसांपूर्वी झाला असावा असा, अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...