Thursday 4 April 2019

जेएनयूमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा बनावट; दंडाधिकाऱ्यांचा अहवाल


Magistrate report says No Pakistan Zindabad slogans at JNU videos doctored | जेएनयूमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत; दंडाधिकाऱ्यांचा अहवाल
नवीदिल्ली,दि.04 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असं दंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे. याबद्दलचा व्हिडीओ छेडछाड करण्यात आलेला होता, असं ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. हा अहवाल दिल्ली सरकारला आज सादर केला जाऊ शकतो. एकूण 25 पानांच्या या अहवालात जेएनयूमध्ये घडलेल्या घटनांचा क्रम देण्यात आलेला आहे. 
न्यूज18 नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, जेएनयू प्रकरणात दोन व्हिडीओ समोर आले. यातील एक व्हिडीओ 9 फेब्रुवारीचा, तर दुसरा 11 फेब्रुवारीचा होता. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जेएनयूमधील कार्यक्रमासाठी बोलावलं होतं, अशी माहिती दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात आहे. यामध्ये जेएनयूच्या एन्ट्री रजिस्टरचा उल्लेख आहे. संबंधित वृत्तवाहिनीनं या संदर्भातील व्हिडीओ आदेश देऊनही दंडाधिकाऱ्यांना सोपवला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झालेल्या जेएनयूमधील व्हिडीओंची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.
 या व्हिडीओंचा वापर पोलिसांकडून पुरावा म्हणून करण्यात येईलच याची खात्री देता नाही, अशी माहिती अहवालात आहे. यावरुन दिल्ली उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. देशद्रोह म्हणजे नेमका काय असतो हे तुम्हाला कळतं का?, असा सवाल यावेळी न्यायमूर्ती प्रतिभा रानी यांनी दिल्ली पोलिसांना विचारला. जेएनयू प्रकरणात विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला पोलिसांनी 12 फेब्रुवारीला अटक केली होती. 


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...