Thursday, 11 April 2019

निवडणूक कर्मचार्‍यांवर नक्षल्यांचा हल्ला

गडचिरोली,दि.11ः-छत्तीसगडच्या दंतेवाडा परिसरातील नक्षली हल्ल्याला २४ तास उलटत नाही, तोच  १0 एप्रिल रोजी मतदानाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभीया गट्टा गावपासून काही अंतरावर नक्षल्यांनी निवडणुकीच्या कर्तव्यावर जात असलेल्या कर्मचार्‍यांना लक्ष्य केले आणि आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये सीआरपीएफ १९१ बटालियनचा एक जवान जखमी झाल्याची घटना  दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. सुनील कुमार असे जखमी सीआरपीएफ जवानाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली तालुक्यातील जांभीयागट्टा जवळील मतदान केंद्रावर सीआरपीएफचे जवान निवडणूक कर्मचार्‍यांना घेऊन जात असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सीआरपीएफ जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर आयईडी स्फोट घडवून आणल्याने स्फोटात सीआरपीएफचे सुनील कुमार हे जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आल्याचे कळते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...