नवी दिल्ली,दि.02- लोकसभा निवडणुकीच्या बिहारमधील गया येथील भाजपच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीला संबोधित करीत असताना मोठी चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ढिसाळ नियोजनामुळे लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या असल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोदींनी एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गयामध्ये जनतेला संबोधित केले. त्यावेळी सभास्थळी ठेवलेल्या खुर्च्या कमी पडल्या आणि चेंगराचेंगरी झाली. दरम्यान काहींनी एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ सभेच्या स्थळावर येत जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
No comments:
Post a Comment