खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.०३– विरोधकांनी तयार केलेल्या महाआघाडीच्या महामिलावटला आमची महायुती सुपडासाफ करेल असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यातील देशद्रोहाचा गुन्हा हटविण्यावर टिका केली.सोबतच राष्ट्रीय सुरक्षेशी काँगेसने खेळण्याच्या केलेल्या प्रयत्नाबद्दल सरंक्षणमंत्री राहिलेले शरद पवार गप्प का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.३) केला.तसेच पवारांंना काँग्रेसचा जाहिरनामा मंजूर आहे का सांगावे लागेल असे म्हणत आत मी येथे फक्त केलेल्या कामाचा तपशील देण्यासाठी आलो आहे असे म्हणाले.भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी गोंदियात आले होते.
पंतप्रधानांनी वर्धा येथे महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा घेतली. या सभेला अपेक्षित गर्दी झाली नव्हती मात्र गोंदियातील सभेत भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आपल्या ३२ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी काँग्रेसच्या घोषणापत्राचा तब्बल दहा मिनिटे खरपूस समाचार घेतला. देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी प्रामाणिकपणे सांगावे की देशाशी विभागणी करण्याचा कट रचू पाहणा-या काँग्रेसचे त्यांना खरच समर्थन करावे काय याचे उत्तर त्यांनी जनतेल दिलेले बरे, देश विघात कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू नये, अशी भूमिका घेणा-या पक्षाचे तुम्ही समर्थन करता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला.
यावेळी या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडा-यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत,आ.परिणय फुके,आ. विजय रहांगडाले, बाळा काशिवार, संजय पुराम , माजी खा.खुशाल बोपचे, प्रदीप पडोळे, उमेदवार सुनील मेंढे, माजी आ.केशव मानकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, विनोद अग्रवाल, माजी मंत्री गौरीशंकर बिसेन, माजी.खा.शिशुपाल पटले, खा.बोधसिंह भगत, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की,मी कुठून आलो,कुठ जन्म झाला हेच विरोधकांना पडले आहे.काँग्रेसच्या लोकाकंडून मला शौचालयाचा चौकिदार बोलले जात आहे.मला देश चालविता येत नाही अशी टिका केली जाते.काँग्रेसच्या काळात शेतकरी,सैनिक व युवक वर्ग चिंतेत होता,आता मात्र चिंतामुक्त झाला आहे.यापुर्वी मी जेव्हा आलो होतो तेव्हा तुमचे आशीवार्द व्याजासह देईन असे आश्वासन दिले होते.तुम्हाला हिशोब द्यायला आलो असून तुमच्या आशीर्वादामुळे विकासाची कामे झाली आहेत.त्यामुळेच आज पाचवर्षानंतर मी सर्वांचे हात जोडून धन्यवाद देतो,तसेच यावेळीही संधी द्यावी असे आवाहन करतो असे म्हणाले.यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईची आठवण करुन देत विसरु शकता असा प्रश्न विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात दुसरी प्रचार सभा घेतली आणि या सभेतूनही राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. ङ्कराष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप सध्या उडाली आहे. झोप उडण्याचे कारण तिहार कारागृहात बंदिस्त आहे. जो आत गेलाय तो चौकशीत सगळे काही बोलून गेला तर आपले काय होईल, याची भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहेङ्क, असे नमूद करतानाच या सगळ्याचा पर्दाफाश होणारच आहे.तो दिवस आता दूर नाही, असा सूचक इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.
पंतप्रधानांनी कुणाचेही नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला लक्ष्य केले.पंतप्रधानांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. हा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कारस्थानांचं योजनापत्र असल्याचा निशाणा मोदींनी साधला. काँग्रेसने देशाचे रक्षण करणा?्या जवानांचे खच्चीकरण करण्याचा डाव आखला आहे. ङ्कभारत तेरे टुकडे होंगेङ्क या घोषणा ज्या प्रवृत्तींनी दिल्या त्यांना खतपाणी घालण्याचेच काम काँग्रेस करत आहे, अशी तोफही मोदींनी डागली.
कप्तानानंतर उपकप्तानाची ही माघार
लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कप्तानाने माघार घेतली तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणातून उपकप्तानाने माघार घेतली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली. ते म्हणाले धान उत्पादकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे काम महाराष्ट्रतील भाजप सेना युती सरकारने अतिशय प्राणाणिकपणे केले आहे. सिंचन प्रकल्पांसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील नझुल पट्टेधारकांचा विषय असो की धानाला ५०० रुपये बोनस देण्याचे काम असो असे अनेक जनहिताचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. आघाडी शासनाच्या कारर्किदीत जेवढी धान खरेदी झाली नाही, त्याहून पाचपट अधिक धान खरेदी युती सरकारच्या काळात झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
No comments:
Post a Comment