Friday, 19 April 2019

गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार

गोंदिया,दि.19  – उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाºया ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. सात दिवस उपचारासाठी बंद घरात डांबून ठेवलेल्या एका १७ वर्षाच्या मुलीवर त्या ढोंगी बाबाने सतत पाच दिवस अतयाचार केला. त्या ढोंग्याला आता तुरूंगाची हवा खावी लागली.   
गोंदिया शहरातील एका कुटुंबातील महिला मंडळी आरोग्याला घेऊन त्रस्त होती. त्यातच त्यांच्या घरातील एका १७ वर्षाच्या मुलीच्या छातीला गाठ आल्याने ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा फुलचूर येथील लंकेश उर्फ वामनराव मेश्राम (३०) या ढोंगी बाबाने केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी २७ मार्चला बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली.त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना आरोपी १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पिडीत मुलीलाच नव्हे तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी देण्याचे काम त्याने केले. त्यानंतर गुंगीत भिंगत असलेल्या त्या पिडीतेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तिची मावशीही त्या पिडीतेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिले होते.
त्यामुळे तिची मावशी सुध्दा त्याच खोलीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर पिडीतेवर अत्याचार केला. परंतु त्याचा विरोध कुणीच करू शकले नाही. त्या घरात सात दिवस सात माणसांना ढोगीं बाबाने गुंगीचे औषध दिले. सातपैकी ८-८ वर्षाची दोन मुले व पाच महिला-मुली होत्या. ३१ मार्चला त्याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही. १ ते ४ एप्रिल दरम्यान दररोज चार दिवस त्याने तिच्यावर बळजबरी केली.    ३७६ (२) (जे) (एन), ३४२, ५०६ सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु लोकांनी त्याला चांगलाच चोप दिल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ९ एप्रिल रोजी त्याला पोलीस उपनिरीक्षक संदीया सोमनकर यांनी अटक केली. न्यायालयाने ९ ते १५ एप्रिल दरम्यान पोलीस कोठडी सुनावली. आता त्याला भंडाराच्या कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...