Wednesday, 17 April 2019

आल्लापल्ली येथे अवैध प्रवाशी वाहनाला भीषण अपघातः तीन ठार


तालवाडा जवळील घटना

गडचिरोली,दि.17 -  सकाळच्या सुमारास आल्लापल्लीहून भामरागडच्या आठवडी बाजाराकरिता निघालेल्या महिंद्रा पिकअप  (क्र. एम एच ३४ एम ३७२८) आणि पेरमिली (मांड्रा) येथील अवैध प्रवाशी वाहन  या दोन वाहनात झालेल्या भीषण धडकेल तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज बुधवारी (दि.17) रोजी आल्लापल्ली नजीक घडली.

मृतकामध्ये दोन महिला व एक पुरुष यांचा समावेश असून मृतांचे नाव अद्याप कळू शकले नाही. याच अवैध प्रवासीवाहन मधील अन्य 11 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 
आल्लापल्लीवरून भामरागडच्या आठवडी बाजारासाठी निघालेले महिंद्रा पिकअप हे आल्लापल्ली नजीक पोचताच विरुद्ध दिशेने येणारी अवैध प्रवाशी वाहन यांच्यात जोरदार धडक झाली. भरधाव वेगात असलेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी असलेल्या अवैध प्रवाशी वाहनावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे. या अपघातामध्ये नाहक तिघांचा बळी गेला असून अन्य अकरा जखमींवर अहेरीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघातामधील मालवाहू ही नागेपल्ली येथील शिंदे तर  अवैध प्रवाशी वाहन हे पेरमली (मांड्रा) येथील सुनील सुरमवार यांच्या मालकीची असल्याचे कळते.
अहेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या मेमोवरून अहेरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. यावेळी असिफ पठाण, प्रमोद आत्राम सरपंच पेरमिली, वंजा गावडे यांनी अपघात ग्रस्तांना प्राथमिक उपचाराकरिता मदत केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...