अर्जूनी/मोर,दि.07ः-भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शैतकर्याना फसवी कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वतः ला शेतकरी कैवारी असल्याचे सांगत आहेत. दारिद्रय. गरिबी. बेरोजगारी. शेतकरी आत्महत्या. रोजगार हमी योजना बंद करून ग्रामीण भागातील रोजगार भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर हिरावून घेतला सुशिक्षित बेरोजगार याची काळजी घेणे गरजेचे आहे. रिकाम्या हातात काम देणे गरजेचे आहे मात्र भाजप सरकार आपल्या मनमर्जी कारभार करून जनतेला वेठीस धरले आहे अशा शेतकरी विरोधी सरकारला जनतेने मतपेटीतून भाजप सरकारला घरी पाठवले पाहिजे असे आवाहन मनोहर भाई अँकेडमी वर्षाताई पटेल यांनी ईटखेडा येथे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पिरिपा खोरिपा व मित्रपक्ष ऊमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी बोलत होत्या.
केद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील पाच वर्षात गोंदिया भंडारा जिल्हा चा विकास खुंटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या विमानात बसून गोंदिया येथे आले ते विमानतळ सुद्धा आघाडी सरकारच्या काळात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तयार केला आहे. अर्जूनी/मोर तालुक्यातील इटियाडोह धरण माझे सासरे मनोहर पटेल यांच्या हस्ते झाले आहे. आम्ही श्रीमंत असलो तरी आमची तळमळ गोरगरिबांच्या हक्काचे रक्षणासाठी लढाई आहेभंडारा-गोंदिया जिल्हा विकास करण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment