देवरी: 15
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वाहन चालकाची दादागिरी आणि गुंडगिरी देवरी येथील बस स्थानकावर आज घडली. प्रवाशांची सोय व्हावी आणि चौकशीचे पुरेपूर समाधान व्हावे या उद्देशाने वाहतूक नियंत्रण कक्ष आणि चौकशी हे कार्यालय या ठिकाणी आहे. देवरी वरून गोंदिया जाण्यासाठी प्रवासी, जेष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले दुपारी 12:15 पासून बसची वाट बघत होते. भर दुपार पासून सदर शेकडो प्रवासी बस च्या येण्याची वाट बघत होते. दुपारी 2:30 वाजता बस उशिरा का आहे ही चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना बस स्थानक व्यवस्थापक वाढीवा कोणतीही माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देतांना आढळून आले.
आपल्या कर्तव्यावर असतांना चौकशी कक्षामध्ये वाहक आणि चालकासोबत गप्पा मारण्यात व्यस्त असलेल्या वाढीवा व्यवस्थापकाला माहिती विचारली असता MH40-AQ-6050 या मानव विकास च्या वाहन चालक डब्लू खेकरे यांनी यांनी कोणतेही अधिकार नसतांना सदर कार्यालयात माहिती विचारणाऱ्या दुर्गादास गंगापारी आणि महिला प्रवाशासी गैरवर्तणूक करून खुलेआम गुंडागिरी आणि दादागिरी केल्याची घटना घडली. प्रवाशांनी मारण्याची धमकी यावेळी दिली.
सदर वाहन चालक कर्तव्यावर असतांना गणवेशात सुद्धा नाही आणि प्रवाशांना मारण्याची धमकवण्याची घटना घडून सुद्धा व्यवस्थापकांनी त्याच्या विरुद्ध कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि तक्रार करून ही कोणता फायदा नाही असे प्रतिउत्तर दिले.
एस टी चा प्रवास सुखाचा प्रवास ही संकल्पना देवरी सारख्या ग्रामीण नक्षलग्रस्त भागातील प्रवाशांना या गुंडागिरी करणाऱ्या वाहन चालकामुळे आणि व्यवस्थापकामुळे घेता येत नाही त्यामुळे खाजगी वाहनांनी प्रवासी प्रवास करीत आहे.
सदर घटनेची तक्रार प्रवासी दुर्गादास रमेश गंगापारी यांनी केली असून सदर वाहन चालक डब्लू खेकरे आणि व्यवस्थापक वाढीवा यांना निलंबित करून तात्काळ कारवाही करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
No comments:
Post a Comment