Saturday 6 April 2019

भाजपा खासदार, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, दि. 06-भाजपाचे विद्यमान खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी (दि.६) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच अनेकदा त्यांनी थेटपणे पंतप्रधान मोदींविरोधातही भाष्य केले होते. त्यामुळे ते भाजपापासून दुरावले होते. त्यातच भाजपाने त्यांचे लोकसभेचे तिकीटही कापल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस प्रवेशावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, स्थापना दिनीच जड अंतकरणाने मला माझा जुना पक्ष (भाजपा) सोडावा लागत आहे.
मात्र, यामागचे कारण सर्वांनाच माहिती आहे. भारतरत्न नानाजी देशमुख, महान पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आमचे मित्र-तत्वज्ञ-गुरु-मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या निष्ठावंत मार्गदर्शकांचा भाजपा सोडताना दुःख होत आहे. मात्र, नाईलाजाने मी आता अन्यायाला कारणीभूत ठरणाऱ्या आणि लोकशाहीला हुकूमशाहीत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
मात्र, आता काँग्रेस प्रवेशानंतर मला आशा आहे की, एकता, समृद्धी, वाढ, विकास आणि प्रतिष्ठा यामाध्यमातून मला लोकांच्या, देशाच्या आणि समाजाच्या सेवेची संधी मिळेल. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधी, नेहरु, पटेल आणि इतर महान राष्ट्र पुरुषांचा पक्ष आहे. काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी हे आजचे आणि उद्याचे गतिशील, सक्षम आणि यशस्वी चेहरा असलेले नेते आहेत. त्यामुळे मी चांगल्या दिशेने चाललो असल्याची जाणीव मला आहे. दीर्घकालीन लोकशाहीच्या दिशेने जाताना लालू आणि तेजस्वी यांच्या राजदसोबत मी आहे, असे यावेळी सिन्हा म्हणाले.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...