Thursday, 4 April 2019

विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपची संस्कृती नाही- लालकृष्ण अडवाणी


dont call anyone anti national says LK Advani in blog indirectly attacks pm modi | राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही; अडवाणींचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा
नवी दिल्ली,दि.04: भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे, तर विरोधक मानतो. स्थापनेपासून हीच भाजपची संस्कृती आहे, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. वेगळी मते मांडणाऱ्यांना आम्ही कधीही शत्रू मानले नाही, असे ही त्यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
कित्येक महिन्यापासून जाहीर सभांमधून भाषण बंदी असणाऱ्या, संसदेतही मौन बाळगणाऱ्या अडवाणींनी ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'देश प्रथम, पक्ष नंतर आणि अखेर स्वत:,' या शीर्षकानं अडवाणींनी ब्लॉग लिहिला आहे. राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपची संस्कृती नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 
काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम हटवण्याचे आश्वासन दिले. त्यावरुन सुरू असलेल्या राजकारणारदेखील अडवाणींनी ब्लॉगमध्ये भाष्य केले आहे. 'भारतीय राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेनुसार, आम्हाला राजकीय विरोध करणाऱ्यांना आम्ही कधीही देशद्रोही म्हटले नाही. प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य आहे. वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे, असं पक्ष मानतो,' अशा शब्दांमध्ये अडवाणींनी मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...