Monday, 1 April 2019

ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक दिनदर्शिकेचे लोकार्पण

देवरी: 1 एप्रिल
तालुक्यातील लोकप्रिय आणि आईएसओ मानांकनप्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे शैक्षणिक सत्र 2019-2020 च्या शालेय दिनदर्शिकेचे थाटात लोकार्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे, पालक शिक्षक संघाचे सभासद, सर्व शिक्षक आणि विध्यार्थी उपस्थित होते.
शालेय दिनदर्शिकेमध्ये शालेय आणि सहशालेय उपक्रमासोबत विविध शैक्षणिक गोष्टीची माहिती देण्यात आलेली आहे.
विद्यार्थी आणि पालकांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक नितेश लाडे, विश्वप्रीत निकोडे, राहुल मोहूर्ले, आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...