पुणे,दि.15 : भारतीय हवामान विभागाने आज शेतकरी आणि सर्वासामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे़. त्यात ५ टक्के कमी अथवा अधिक फरक गृहीत धरला आहे़. त्याचवेळी ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची १७ टक्के शक्यता असून ९० ते ९६ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पावसाची ३२ टक्के शक्यता वर्तविली आहे़ अर्थात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ही ४९ टक्के इतकी असणार आहे़.
मॉन्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतो़ मॉन्सून कसा होईल, यावर भारतातील बाजारपेठेतील चढउतार अवलंबून असल्याने शेतकऱ्यांसह उद्योग जगताचेही भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात येणाऱ्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष असते़. आचारसंहिता असल्याने निवडणुक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर भारतीय हवामान विभागाने आपला पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर केला़. त्यात त्यांनी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी संपूर्ण देशासाठी सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला आहे़. त्यात ५ टक्के कमी अथवा अधिक फरक गृहित धरला आहे़.
हा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील डिसेंबर, जानेवारीचे तापमान, दक्षिण भारतीय महासागरातील समुद्राचे फेब्रुवारीतील तापमान, पूर्व अशिया समुद्र सागरी स्तरावरील फेब्रुवारी-मार्चचा दबाव, उत्तर पश्चिमी यूरोप जमीन पृष्ठभागावरील हवेचे जानेवारीमधील तापमान व विषृववृत्तावरील पॅसिफिक गरम पाण्याचे फेब्रुवारी-मार्चचे तापमा या प्रमुख पाच घटकांचा विचार करुन या मॉडेलनुसार अंदाज व्यक्त केला जातो़.
एलनिनोविषयी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहे़. सध्या एलनिनो हा कमजोर पडला असून त्याची स्थिती मॉन्सूनच्या काळात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे़. हिंदी महासागरातील स्थिती स्थिर असून मॉन्सूनचा काळात ती अनुकुल होत जाण्याची शक्यता आहे़.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने २०१९ मधील मॉन्सून हा देशभरासाठी दीर्घकालावधीसाठी सर्वसाधारण राहणार असून सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे़. देशाचा सरासरी पाऊस हा ८९ सेंटीमीटर आहे़. त्याचवेळी त्यांनी कमी पाऊस होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे़. सरासरीपेक्षा ४९ टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता या अंदाजात व्यक्त केली आहे़
No comments:
Post a Comment