Tuesday, 9 April 2019

सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका एसीबीच्या जाळय़ात


गडचिरोली,दि.09ः-एका संस्थेला शैक्षणिक प्रयोजनार्थ भोवगटा मूल्य भरून ग्रामपंचायतअंतर्गत जागा मंजुरीचा ठराव करून देण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५0 हजार रुपयाप्रमाणे दीड लाखांची लाच मागणारे तालुक्यातील खरपुंडी येथील सरपंच, उपसरपंच व प्रभारी ग्रामसेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
आनंदराव दादाजी नैताम (४५) सरपंच, कमलेश अशोक खोब्रागडे (२९) उपसरपंच, अर्चना बाळासाहेब श्रीगिरवार (४५) प्रभारी ग्रामसेविका असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एका संस्थेला शैक्षणिक प्रयोजनार्थ भोवगटा मुल्य भरून ठराव घेऊन मंजूर करून देण्याच्या कामाकरिता तक्रारकर्त्यांकडून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका यांनी प्रत्येक ५0 हजार रूपयांची मागणी केली. मात्र तक्रारकर्त्यास लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. दरम्यान ग्रामसेविकेने ४0 हजार, सरपंच ५0 हजार व उपसरपंच ३0 हजार रूपये पंचासमक्ष पैशाची मागणी केली. मात्र तक्रारीबाबत संशय आल्याने लाच रक्कम स्वीकरण्यास नाकारले यावरून त्यांच्याविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्लवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहूलकर, पोलिस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहा. फौजदार मोरेश्‍वर लाकडे, पोहवा प्रमोद ढोरे, नथ्थु धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पो.शि. गणेश वासेकर, महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, मपोशि सोनल आत्राम, सोनी तावडे, तुळशिराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...