Monday, 29 April 2019

देवरी आमगाव रोडवर दुतर्फा ट्रक्स पार्किंगमुळे अपघातांना आमंत्रण

देवरी:29
देवरी येथील आमगाव रोड वर सकाळी 8 ते 9 च्या सुमारास अनधिकृतरित्या ट्रक्स पार्किंग मूळे अपघातांना आमंत्रण टाळता येत नाही याकडे प्रशासनाचे आणि पोलीस विभागाचे लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
सविस्तर वृत्त असे की देवरी आमगाव रोड वर 2 शाळा आणि 1 महाविद्यालय आणि 1 औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय आहे.  परीक्षा सुरू आहेत विध्यार्थी आणि सामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यांनी येत आहेत.या रस्त्यावर मोठया प्रमाणात सर्वसामन्याची आवक जावक असते. तरी सुद्धा या रस्त्यावर प्रशासन दुर्लक्ष करीत असून होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...