Friday 6 January 2017

महात्मा गांधींचा फोटो नसलेल्या नोटांमुळे खळबळ

शेवपूर (वृत्तसंस्था)- नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आणलेल्या नोटांचा एकीकडे तुटवडा जाणवत असताना काही नव्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटोच गायब असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 
मध्यप्रदेशातील शेवपूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियामधून (SBI) महात्मा गांधींचा फोटो नसलेल्या 2000 रुपयांच्या नव्या नोटा मिळाल्यावर धक्का बसला. 
या नोटा बनावट आहेत असे शेतकऱ्यांना वाटले, मात्र या नोटा बनावट नसून, त्यांच्या छपाईमध्ये चूक झाली असल्याचे बँकेकडून सांगण्यात आल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.  
बिच्छुगावडी या खेडेगावातील लक्ष्मण मीना या शेतकऱ्याने SBI च्या शाखेतून 6000 रुपये काढले होते. त्यांनी 2000 ची नोट आतापर्यंत पाहिलीच नव्हती. त्यामुळे बँकेच्या रोखपालांनी नोटा दिल्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, जेव्हा लक्ष्मण घरी आले तेव्हा त्यांच्या मुलाने नोटा पाहिल्या. गांधीजींचा फोटो नसल्याने या नोटा बनावट असल्याचे त्याने सांगितले. त्यावर त्वरीत बँकेत परत जाऊन त्यांनी ही बाब बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. बँक अधिकाऱ्यांनी त्या नोटा शांतपणे माघारी घेतल्या, परंतु बदल्यात नव्या नोटा दिल्या नाहीत. 
येथील शाखा व्यवस्थापक श्रावणलाल मीना म्हणाले, "या नोटा बनावट नाही. ज्या ठिकाणी फोटो हवा होता ती जागा कोरी राहिली आहे. आम्ही त्या नोटा माघारी स्वीकारल्या आहेत."

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...