भाजपा प्रचार सभेत ना. बडोले यांचे प्रतिपादन

ते ४ जानेवारी रोजी गोंदिया येथील नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे नगराध्यक्षाचे उमेदवार अशोक इंगळे व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित मरारटोलीच्या सभेत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार परिणय फुके, आमदार संजय पुराम, माजी आमदार खुशाल बोपचे, खोमेश रहांगडाले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्षाचे उमेदवार अशोक इंगळे, नेतराम कटरे, रचना गहाणे, भरत क्षत्रीय, रविकांत बोपचे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, उमेदवार घनश्याम पाणतवणे, विमला मानकर यांच्यासह नगरसेवकचे उमेदवार व भाजपा पदधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना. बडोले म्हणाले की, भाजपा विचारधारा ही समाजाच्या अंतिम घटकाच्या विकासाची असून जनतेला परिवर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याच्या माध्यमातून अल्पावधीतच दिसून आले आहेत. भाजपाचे ऊर्जावान कार्यकर्ते हे समाजाची सेवा करण्याकरिता या निवडणुकीत उभे आहेत. यांना प्रतिनिधी करून नगर परिषदेत पाठवा व विकास घडवून आणा. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने विकासाला मत दिली होती व भाजपाचे ध्येय केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या विकासाची गंगा शहरापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment