Thursday 5 January 2017

प्रजासत्ताकदिनी ‘सिंदीबिरी‘ होणार ‘कॅशलेस गाव‘


जेठभावडा ग्रामपंचायतीचा उपक्रम

सुरेश भदाडे


देवरी- अतिदुर्गम, मागास आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेले गोंदिया जिल्ह्यातील सिंदीबिरी हे गाव येत्या प्रजासत्ताकदिनी कॅशलेस गाव म्हणून नावारूपास येण्याच्या मार्गावर आहे.
देवरीपासून १० किलोमीटर अंतरावर दक्षिणेला असलेले जेमतेम ७५३ लोकवस्तीचे qसदीबिरी हे छोटसे गाव. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव आधीच गोदरीमुक्त आहे. गावातील जनता नेहमी गोडीगुलाबीने नांदते. गावात भांडणतंटे नाहीत. हा गाव देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाèया जेठभावडा या ग्राम पंचायतीमध्ये मोडतो. गावचे सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले सुद्धा सिंदीबिरीचेच. या गावात कोणतेही नावीन्यपूर्ण उपक्रम असोत, सदैव ग्रामस्थ एकदिलाने ते तडीस नेण्यास सदैव तत्पर असतात. गावात स्वच्छ भारत अभियानाला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत‘च्या हाकेला गावकऱ्यांनी उत्तम साथ दिली. बघता बघता संपूर्ण गाव आरशासारखे लख्ख झाले. गावचे सरपंच डॉ. रहांगडाले हे नित्यनेमाने ग्रामस्थांच्या मदतीने सूर्यकिरणांआधी गाव झाडून स्वच्छ करतात.
गावातील विजेच्या खांबाला कचरा पेट्या बसविल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. गावात संपूर्ण पॉलिथिन बंदी आहे. गावातील आबालवृद्धांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे. जलयुक्त शिवार या माध्यमातून एकाच दिवशी गावकऱ्यांनी शिवारात तीन बंधारे बांधले. यामुळे पाण्याची पातळी वाढण्यासह प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली. गावात सुशासन असल्याने आतापर्यंत एकही अर्ज माहितीच्या अधिकाराखाली लावला गेला नाही, अशी माहिती गावचे सरपंच डॉ. रहांगडाले यांनी दिली.
अलीकडे देशात नोटबंदी अभियान राबविण्यात आले. यातून पुढे देशाने कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरवात केली. त्या अनुषंगाने गावात ग्रामस्थांची सभा घेऊन आपला संपूर्ण गाव कॅशलेस कसा करता येईल, यावर विचार मंथन करण्यात आला. याकामी देवरीचे उपविभागीय अधिकारी मिलिंद टोणगावकर, तहसीलदार संजय नागतिळक, गटविकास अधिकारी एस.एन. पांडे, सरपंच डॉ. रहांगडाले, तलाठी आर.एच. उपरीकर, ग्रामसेवक एस.डब्ल्यू. बनसोड यांनी पुढाकार घेतला. गावकऱ्यांना कॅशलेस व्यवहार कसे व का करायचे याचे महत्त्व पटवून देण्यात आले. परिणामी, नववर्षाच्या आगमनप्रसंगी सिंदीबिरी या लहानशा खेडेगावाने आपले गाव संपूर्ण कॅशलेस करण्याचा संकल्प सोडला. आता हे गाव येत्या २६ तारखेला कॅशलेस होण्याच्या मार्गावर आहे.
उल्लेखनीय म्हणजे जेठभावडा या ग्रामपंचायतीतील संपूर्ण व्यवहार कॅशलेस केल्याचे सरपंच-सचिवांनी सांगितले.

गावकऱ्यांना कॅशलेसमुळे त्रास होणार नाही- डॉ. जितेंद्र रहांगडाले
संपूर्ण देशात कॅशलेसचे वारे वाहत आहेत. कॅशलेस व्यव
हार केल्याने भ्रष्टाचारास मुळीच थारा नसतो. शिवाय आपली रोख चोरीला जाण्याचा वा ती जवळ बाळगण्याचा त्रास नसतो. शिवाय पैशाचा व्यवहार करण्यासाठी गावातून तालुक्याला जाणे, हे जिकरीचे काम आहे. सुटे पैसे, बँकेत रांगेत लागणे आदी भानगडीतून मुक्तता मिळते. आणि सर्वांना ही सिस्टिम सोईस्करसुद्धा आहे. यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. यामुळे आता प्रत्येक जण मोबाईल फोन, एटीएम, रुपेकॉर्डचा आणि चेकबुकचा वापर करू लागला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...