
जे मोदींवर टीका करतात त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी मोदी सीबीआय, ईडीचा वापर करत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मी थेट नरेंद्र मोदींना आव्हान देते. तुम्ही काही करु शकत नाही. तुम्ही लोकांचा आवाज दाबू शकत नाही.
सुदीप बंडयोपाध्याय यांच्या अटकेनंतर आम्ही गप्प बसू, आंदोलन करणार नाही असा त्यांचा समज असेल तर तो चुकीचा आहे. आम्ही उद्यापासून धरणे आंदोलनाला बसणार आहोत असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. आज मंगळवारी रोझ व्हॅली चिट फंड घोटाळयात सीबीआयने तृणमुल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडयोपाध्याय यांना अटक केली. ते ममता बॅनर्जी यांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक आहेत.
No comments:
Post a Comment