Wednesday 4 January 2017

एसबीआयने पेटीएमसह सर्व ई वॉ़लेट केले ब्लॉक

नवी दिली,(वृत्तसंस्था) दि. 4 – नोटाबंदीचा निर्णय आणि सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्यापासून पेटीएमसह अनेक ई वॉलेटना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने या ई वॉलेट्सना जबदस्त दणका देताना सर्व ई वॉलेट्स ब्लॉक केले आहेत.
स्टेट बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे एसबीआयच्या नेट बँकींगमधून पेटीएम, मोबी क्विक एअरटेल मनीसह अन्य ई वॉलेट्समध्ये पैसे पाठवता येणार नाहीत. मात्र क्रेडिट कार्डमधून या ई वॉलेट्समध्ये पैसे जमा करता येतील. दरम्यान, ई वॉलेट्स ब्लॉक करण्याच्या निर्णयाबाबत रिझर्व्ह बँकेने खुलासा मागवला असता संरक्षण आणि व्यावसायिक हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एसबीआयने सांगितले. याबाबतचे वृत्त सीएनबीसीने दिले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...