Tuesday 3 January 2017

तृणमूलच्या विद्यार्थी शाखेचा भाजप कार्यालयावर हल्ला

कोलकाता (वृत्तसंस्था) : तृणमूल काँग्रेसचे नेते (टीएमसी) आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना एका चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी अटक केल्यामुळे पक्षाच्या विद्यार्थी शाखेने आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जोरदार हल्ला केला.
केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर काही वेळातच बंडोपाध्याय यांना अटक करण्यात आली. "त्यांना जे काही प्रश्‍न आहेत, त्यावर माझे स्पष्टीकरण देण्यासाठी मी येथे आलो आहे', अशा प्रतिक्रिया सीबीआयच्या कार्यालयात जाण्यापूर्वी बंडोपाध्याय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केल्या होत्या. या अटकेचा निषेध करत काँग्रेसनेही आज केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने त्यांच्या राजकीय विरोधकांवर वैरभावनेने केलेली ही कारवाई आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. तर, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर टीका केली.
'आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकीय बदलल्याच्या या कृतीचा निषेध करतो. ही अटक इतर कोणत्याही कारणामुळे नसून नोटाबंदीच्या कारणामुळे आहे. ही केवळ आर्थिक आणीबाणी नसून संपूर्ण आणीबाणी आहे', अशी टीका बॅनर्जी यांनी केली. बंडोपाध्याय यांच्या अटकेविरुद्ध न्यायालयात लढा देणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...