५ कोंबड्या आणि एका बकरीची केली शिकार

नवेगाव राष्टीय अभयारण्यातुन हा बिबट्या भटकंती करत कोहळगावात शिरला. गावातील दादासुर साखरे यांच्या घरातील ५ कोंबड्यांना ठार केले. दुसऱ्या एका घटनेत या बिबट्याने किशोर जांभुळकर यांच्या घरातील एका शेळीची शिकार केली. जांभुळकर याने या बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केले असता बिबट्या गावातीलच सुरेश सहारे यांच्या बंद घरात शिरला. गावकऱ्यांनी त्याला बंद करून याची माहिती वनविभागाला दिली. तसेच वन अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेत अखेर बिबट्याला जेर बंद केले असून त्याला नवेगावबांध राष्टीय अभयारण्यातील अनाथालयात ठेवण्यात आले आहे. या बिबट्यावर उपचार करून बिबट्याला पुनः जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली. या बिबट्याला पाहण्याकरिता आणि बिबट्याचे फोटो काढण्यासाठी गावातील लोकांनी तोबा गर्दी केली होती. परिणामी, त्यामुळे वन अधिकाऱ्यांना कारवाईत याचा त्रास सहन करावा लागला.
No comments:
Post a Comment