Wednesday 4 January 2017

दिल्ली येथील ओबीसी अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात बैठक

नागपूर,दि.४ -राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी राष्ट्रीय महाधिवेशनाच्या पुर्व तयारीसंदर्भात आढावा बैठक धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात मंगळवारला घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक डॉ.बबनराव तायवाडे होते.यावेळी दिल्ली येथील अधिवेशनात देशातील सर्व ओबीसी संघटनाचे प्रमुख व ओबीसी मध्ये काम करणाèया प्रमुखांची भेट घेण्यासंबधी मार्च महिन्यात दिल्ली येथे एका बैठकीचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरले.या बैठकिला महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,निमंत्रक सचिन राजुरकर,महिलाआघाडी प्रमुख सुषमा भड,शरद वानखेडे,प्राचार्य अशोक जिवतोडे,युवा समित प्रमुख मनोज चव्हाण,गुणेश्वर आरीकर,प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे,जिवन लंजे,गोंदिया जिल्हा संघर्ष कृती समिती अध्यक्ष बबलू कटरे,प्राचार्य शरयु तायवाडे,डॉ.अजय तुमसरे,प्रा.रमेश पिसे,प्रा.राजू गोसावी,प्राचार्य टाले,विजय तपाडकर,कृष्णा देवासे,विनोद उलीपवार,निकेष पिणे,निकेश कोढे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत ८ डिसेंबरला झालेल्या ओबीसी महामोच्र्याचा आढावा घेण्यात आला.यात त्रुट्यापासून सर्वच गोष्टीवर चर्चा करुन दिल्ली येथील अधिवेशनात यावेळी राहिलेल्या त्र्युटा कशा दूर करण्याचे ठरविण्यात आले.सोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत ओबीसी महासंघाची जिल्हा बांधणी करणे,प्रत्येक जिल्ह्यातून किमान २०० प्रतिनिधी दिल्ली अधिवेशनात नेणे,सकाळी ११ वाजेच्या दरम्यान दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणे,महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या ओबीसी मंत्रालयाबद्दल अभिनंदन करीत ओबीसीच्या बजेटमध्ये लोकसंख्येच्याप्रमाणात तरतुद करणे यावर चर्चा करण्यात आली.देशातील सर्वच ओबीसी संघटनेच्या प्रमुखांशी भेट घेऊन देशपातळीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघ बळकट करण्याविषयी चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय ओबीसी महासंघात महिलांना स्थान व वेळेवर येऊन चमकोगिरी करणाèया नेत्यांपासून पुढे सावध राहण्यावर उपस्थितांनी आपले विचार मांडले.प्रास्तविक सचिन राजुरकर यांनी केले.संचालन मनोज चव्हाण यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...