Tuesday 3 January 2017

उघड्यावर शौचास जाल; तर पोलिस कारवाई

देवरी - सिंदीबिरी या गावातील १५ ते २० लोक दररोज उघड्यावर शौचास बसतात. हेच हेरून सरपंचांनी पुढाकार घेऊन पहाटेलाच अशा लोकांना गाठले. त्यांना हागणदारीमुक्तीचा संदेश देत यापुढे उघड्यावर शौचास बसाल तर, पोलिस कारवाई केली जाईल, अशी तंबी दिली. 
नवीन वर्षाच्या पहाटेलाच सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. एम. पांडे, विस्तार अधिकारी अखरते, सचिव एस. डब्ल्यू. बन्सोड यांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना समज दिली. त्यांना गुलाबपुष्प भेट दिले. हागणदारीमुक्तीचा संदेश देत शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. उल्लेखनीय म्हणजे सरपंच रहांगडाले हे ग्रामस्वच्छता मोहिमेअंतर्गत दररोज स्वतः हातात झाडू व फावडा घेऊन परिसराची स्वच्छता करतात.
यातच त्यांना सिंदीबिरी गावातील १५ ते २० नागरिक दररोज उघड्यावर शौचास जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी नवीन वर्षाच्या पहाटेला या लोकांना गाठले. त्यांना हागणदारीमुक्तीचा संदेश देत शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर, या पुढे उघड्यावर शौचास बसल्यास पोलिस कारवाईची तंबी दिली. या अभिनव उपक्रमाला कितपत यश येते, हे येणारा काळच सांगेल. नागरिकांनीही शासनाच्या शौचालय योजनेचा लाभ घेऊन घरी शौचालयांची निर्मिती करावी, अशी अपेक्षा सरपंचांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...