Sunday 1 January 2017

पेट्रोल दरवाढीने नववर्षाची भेट

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपया 29 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 0.97 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करतात. त्याप्रमाणे आजची वाढ करण्यात आली आहे. डिसेंबरमध्येच पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.21 रुपये; तर डिझेलच्या दरात 1.79 रुपये वाढ करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर इंधनाच्या दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे.
आजच अनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात सलग आठव्या महिन्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच, जेट इंदनाच्या दरातदेखील 8.6 टक्‍क्‍यांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...