Wednesday 16 May 2018

चंद्रपूरातील 4 आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट केले सर


मुंबई दि 16 : मिशन शौर्य या धाडसी उपक्रमाअंतर्गत अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने तसेच प्रोत्साहनाने चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील 10 आदिवासी विद्यार्थी महिन्याभरापूर्वी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी निघाले होते. यातील चार विद्यार्थ्यांनी 16 मे रोजी माऊंट एव्हरेस्ट  सर केलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवाडा येथील उमाकांत मडावी, परमेश आले, मनीषा धुर्वे आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा जिवती येथील कविदास काठमोडे या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने नुकतीच चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वे स्थानके देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानके म्हणून विजेती ठरली.त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याचे किर्तिमान राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केले आहे.
मिशन शौर्य हा उपक्रम अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून या विद्यार्थ्यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी चंद्रपुरात आयोजित कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या. या 10 विद्यार्थ्यांपैकी आणखी 2 विद्यार्थी येत्या 2 दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील. या धाडसी, शूर, देशभक्त विद्यार्थ्यांचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...