Monday 28 May 2018

गोंदियातील मतदान केंद्रावर मतदान रोखले

गोंदिया-65, तिरोडा-30, लाखनी-88 मतदान केंद्रावरील इव्हीएम मध्ये बिघाड

दोन तास मतदान प्रक्रिया पूर्वपदावर आली नाही तर मतदान प्रक्रिया बंद

निवडणुक रद्द होणार? राजकीय तर्कवितर्क सुरू


गोंदिया,25- राज्यात दोन लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात व्हीव्हीपीटी मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबले असल्याचे वृत्त मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत.  लाखनी तालुक्यात 88, गोंदिया मतदारसंघ 65  तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघ  30, तुमसर विधानसभा मतदारसंघ 11,अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील खामखुरा व इटखेडा मतदान केंद्रवारील मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबले आहे.नया निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत. उल्लेखनीय म्हणजे या मशिन्समध्ये बिघाड होण्याची आकडेवारी सतत वाझत चालल्याने ही निवडणुक रद्द तर होणार नाही ना? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे बिघाड निर्माण झालेल्या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया दोन तासात सुरू न झाल्यास तेथील मतदान रोखण्याची तरतूद असल्याचे समजते.




No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...