Friday 25 May 2018

चिंता मिटलीः डिजीलॉकर वाहनचालकांच्या मदतीला


Image result for digilocker
मुंबई,दि.25 : ड्रायविंग लायसेंस आणि वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र खराब झाले, गहाळ झाले, वाहन चालविताना कागदपत्रे जवळ नसली तरी आता वाहनचालकांना काळजी करण्याचे कारण नाही. या कागदपत्रांशिवाय इतर शासकीय आणि वैयक्तिक प्रमाणपत्र संगणकीय ‘डिजिटल लॉकर’मध्ये (डिजीलॉकर) जमा करता येणार आहेत. ‘एम परिवहन’ या मोबाइल अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मोबाइल अ‍ॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात येईल. कागदपत्रांची सुरक्षितता देखील यामुळे वाढणार आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी आणि राष्ट्रीय माहिती केंद्राचे तांत्रिक संचालक दीपक सोनार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान विभागाने डिजिटल लॉकर ही संकल्पना आणली असून, विविध शासकीय संस्थांकडून नागरिकांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे त्यावर जतन करून ठेवण्यात येत आहेत. त्यासाठी नागरिकांना डिजिटल लॉकरचे खाते उघडावे लागेल.

डिजिटल लॉकरचे खाते कसे सुरु कराल?
डिजिटल लॉकरचे खाते सुरू करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असून, तो मोबाइल क्रमांकाशी जोडलेला असणे गरजेचे आहे. ‘डिजीलॉकर’ या संकेतस्थळावर जाऊन अथवा प्लेस्टोअरमधून डिजीलॉकर हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर आधार क्रमांक नोंदवून या अ‍ॅपवर लॉग इन व्हावे. या प्रकियेनंतर संबंधितांच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. तो भरल्यास संबंधित खाते कार्यान्वित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...