Friday 25 May 2018

मेट्रो ट्रेन गोंदियापर्यंत विस्तारित करा-ड्रामा

गोंदिया, दि.२५ः: नागपूर शहरात मेट्रो ट्रेनचे कार्य पूर्णत्वाकडे जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते वर्धा, नागपूर जिल्ह्यातील काही स्थानकांपर्यंत तसेच नागपूर ते भंडारापर्यंत विस्तारित करण्याची घोषणा केली. सदर मेट्रो ट्रेन सेवेला गोंदियापर्यंत विस्तारित करण्याच्या मागणीला घेवून निवेदन करण्यासाठी अनेक रेल्वे प्रवाशांचा शिष्टमंडळ डेली रेल्वे मुव्हर्स असोसिएशन (ड्रामा) गोंदियाच्या वतीने ना. नितीन गडकरी यांना ३ जून रोजी नागपूरला जावून त्यांची भेट घेणार आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाद्वारे विस्तृत चर्चेसाठी ३ जून रोजीची वेळ देण्यात आलेला आहे. ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी, अनेक वर्षांपासून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे दुर्गपर्यंत ट्रेन चालवून गोंदिया स्थानकाला उपेक्षित करीत होते. आता मेट्रो भंडारापर्यंत चालवून महा मेट्रोसुद्धा गोंदिया रेल्वे प्रवाशांचा उपहास करीत आहे. मुंबई-नागपूर एक्स्प्रेस, समृद्धी एक्स्प्रेस हायवे सुद्धा नागपूरमध्येच समाप्त होणार आहे. गोंदिया वासीयांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळात गोपाल अग्रवाल, अशोक शर्मा, जितेंद्र परमार, मेहबूब हिराणी, रेल्वे कमिटी सदस्य चंद्रकांत पांडे, नटवरलाल गांधी, नानू मुदलियार, विष्णू शर्मा, प्रकाश तिडके व राजेश बन्सोड यांचा समावेश राहणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...