Friday 25 May 2018

महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर

नागपूर,दि.24 : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. संविधान चौकात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. महागाई वाढवून भाजप सरकार अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला.
या आंदोलनात अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आ. अशोक धावड, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, कृष्ण कुमार पांडे, नितीन कुंभलकर, जुल्फिकार अहमद भुट्टो, किशोर जिचकार, दिनेश यादव,आयशा उईके, दीपक कापसे, कांता पराते, विजय बाबरे, श्रीकांत केकडे, रामाजी उईके, नरु जिचकार, सुरेश पाटील, कुणाल राऊत आदी सहभागी झाले. भाजपाने निवडणुकीपूर्वी जनतेला खोटी आश्वासने देत मोठमोठी स्वप्न दाखविली.
मात्र, निवडणुकीनंतर एकही आश्वासन पाळले नाही. सातत्याने इंधन दरवाढ करून सामान्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकार पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावून जनतेची लूट करीत आहे. या लुटारू सरकारला जनता नक्कीच धका शिकवेल, असा विश्वास यावेळी नितीन राऊत यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...