Friday 25 May 2018

पासपोर्ट सेवा केंद्राच्या कार्यान्वयनासाठी अधिकार्‍यांचे पथक आज चंद्रपुरात

चंद्रपूर,दि.२५ः-केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर जिल्हद्घातील नागरिकांसाठी चंद्रपूर महानगरातील भारतीय टपाल विभागाद्वारे पारपत्रा (पासपोर्ट) सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने या सेवेकरिता नुकतीच हिरवी झेंडी दाखविली आहे. चंद्रपूर महानगरात या सेवाकेंद्राची सुरूवात करण्याच्या दृष्टीने नागपूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील वरीष्ठ अधिकार्‍यांची चमू २५ मे रोजी चंद्रपुरात दाखल होत असून ते या भेटीमध्ये डाक विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांशी सेवा केंद्राच्या उभारणी संदर्भात चर्चा करून आवश्यक माहिती घेणार आहेत.
नागपूर पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रादेशिक पारपत्रा अधिकारी सी.एल. गौतम व त्यांचे सहकारी अधिकारी कुमार यांच्या नेतृत्वामध्ये ही चमू चंद्रपूर येथे येत आहे. चंद्रपूर हे महानगराचे स्थान असल्याने या शहरात पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित व्हावे अशी भुमिका घेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचेशी चर्चा केली होती. सदर चर्चा सकारात्मक झाल्याने व विदेश मंत्रालयाने तिसर्‍या टप्प्यात चंद्रपुरातील पारपत्रा सेवा केंद्रास मान्यता प्रदान केल्याने हे केंद्र यथावकाश सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावरून कार्यवाहीस सुरूवात झाली असल्याचे संकेत या चमुच्या दौर्‍यामधून मिळत आहेत.
चंद्रपूर जिल्हयातील विविध क्षेत्रातील नागरिक,उच्च शिक्षणासाठी विदेशात जावू इच्छिणारे विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, व्यवसायींसाठी मोठ्या प्रतिक्षेनंतर पारपत्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचे स्वप्न केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे साकार होणार आहे. चंद्रपूरातील या पारपत्रा सेवा केंद्राचे कार्यान्वय शीघ्रगतीने व्हावे यासाठी ना. अहीर प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...