आल्लापली(अशोक दुर्गम)दि.19 – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिन्यातील चकमकीत मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारल्या गेल्यानंतर चिडलेल्या नक्षलवाद्यांनी धुमाकूळ माजविला आहे. काल मध्यरात्रीनंतर काही नक्षलवाद्यांनी तलवाडा येथील लाकूड डेपोला आग लावली. याशिवाय आलापल्ली ते भामरागड या मुख्य मार्गावर काही ठिकाणी रस्त्यात झाडे आडवी टाकून वाहतूक अडविली आहे. आलापल्ली पासून 12 किलोमीटरवर असलेल्या तलवाडा या गावाजवळील आलापल्ली वनपरिक्षेत्राचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी पहाटेच्या सुमारास जाळला. यावेळी तिथे एक बॅनरसुद्धा लावले असून त्यात वनविभाग आणि पोलीस विभागाचा निषेध करा, असे आवाहन करण्यात आले आहे. या डेपोत मोठ्या प्रमाणात बिट म्हणजेच जळाऊ लाकूड उपलब्ध आहे. या आगीत अंदाजे 23 बिट जळाले असून जवळपास 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळपासून आलापल्ली वन परिक्षेत्र अधिकारी किरण पाटील हे स्वतः तिथे हजर असून आग नियंत्रनात आली आहे. तसेच तलवाडापासून सुमारे 2 किमी अंतरावर मुख्य मार्गावर एक झाड पाडून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तिथे पण एक लाल कापडी बॅनर लावण्यात आले आहे. एवढेच नाही तर याच मार्गावर भामरागडच्या अलिकडे ताडगावजवळही अशाच प्रकारे झाड पाडून बॅनर लागले आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूक बंद आहे. जंगल परिसर असल्याने गेलेल्या गाडया लगेच परत येत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment