नागपूर,दि.29(विशेष प्रतिनिधी) – गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला.गोरखपूर-यशवंतनगर एक्स्प्रेस नागपूरजवळील कलमेश्वर येथे आली असता या गाडीच्या एका डब्याखालून मोठा आवाज आला. सतर्क प्रवाशांनी डब्याखालून येणारा मोठा आवाज ऐकून याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर तातडीने ही गाडी थांबवण्यात आली. तपासणी केली असता गाडीच्या एसी डब्याखालील चाकाला तडे जाऊन ते तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात पाठवून गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. नागपूर येथे या गाडीला नवा एसी डबा जोडून ही गाडी पुढे रवाना करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment