Friday 25 May 2018

ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर,दि.25 : ग्रामसभेमध्ये एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
छाया जरे असे या महिलेचं नाव आहे. घराच्या उताऱ्यावरून परस्पर नाव कमी केल्याच्या कारणामुळे छाया जरे यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील हा प्रकार आहे. ग्रामसेवकाच्या अंगावर शाईफेक करत छाया जरे यांनी विषप्राशन केले. दरम्यान, या घटनेनंतर छाया जरे यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, छाया आणि तिच्या नवऱ्याच्या नावावर राहत्या घराची नोंद होती. परंतु, मागील महिन्यात पती, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून छाया हिचे नाव घराच्या नोंदीतून कमी केल्याची तक्रार छायाने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्‍यांच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या छाया यांनी ग्रामसभा सुरू असताना आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच ग्रामसेवकाच्या अंगावर शाई फेकत विष प्राशन केले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...