
मृतामध्ये ,सुनील गणेशराम मेहर (वय32) राहणार देवरी याचा समावेश आहे. तर जखमीमध्ये मनोहर गणेशराम मेहर (वय35) याचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरी येथील सुनील मेहर आणि मनोहर मेहर हे दोघे सख्खे भाऊ आपल्या हिरोहोंडा पॅशनप्रो क्र. एमएच35 एएफ7942 या दुचाकीने देवरीकडून नवाटोलाच्या दिशेने जात असतना स्थानिक जैन पेट्रोल पंपासमोर रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात दोघांही भावंडांना जबर दुखापत झाल्याने नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यातील सुनीलची प्रकृती नाजुक असल्याने त्याला प्रथम गोंदिया न नंतर नागपूरला नेत असताना तो वाटेतच मृत्यू पावला. जखमीवर देवरी येथे उफचार सुरू आहेत. या प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून फरार वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment