नागपूर,दि.23 -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.धापेवडा येथील ही घटना आहे. या स्फोटामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला आहे. पद्माकर श्रीराव (वय 45 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. मंगळवारी (22 मे) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्या मालकीची ‘कांचन इंडिया’ सौंदर्य प्रसाधन कंपनी आहे. यासाठी आवश्यक उत्पादन गडकरी यांच्या फार्म हाऊस परिसरात घेतले जातात. याठिकाणी हळद उकळवण्यासाठी एक बॉयलर आहे. याच बॉयलरचा मंगळवारी संध्याकाळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान, ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा घटनास्थळी कांचन गडकरीदेखील उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment