Monday 28 May 2018

भंडारा-गोंदिया मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड,मतदान थांबले

गोंदिया,दि.28ः – पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात व्हीव्हीपीटी मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबले आहे.तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील  30,तुमसर विधानसभा मतदारसंघातील 11,अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील खामखुरा व इटखेडा मतदान केंद्रवारील मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदानाच्या काही वेळानंतरच मतदान थांबले आहे.या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नव्याने EVM आणि  VVPAT मशीनचा वापर करण्यात येत असताना तालुक्यातील  मतदान केंद्रावर मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे मतदान सुरू झाले नसल्याने मतदानाचा वेळ फुकट जात असून वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी केली जात आहे. पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.
तुमसर तालुक्यातील खरबी मतदान केंद्रावरील 330 आणि 334 बूथ वरील ईव्हीएम दीड तासापासुन बंद पडलेले आहेत मतदार मतदान करिता दीड तासापासुन तिथे बसलेले आहेत त्यांच्याजवळ कोणतीही मशीन जास्त ची नसल्यामुळे सध्या तिथे मतदान बंद पडलेला आहे मतदान केंद्र अधिकाऱ्याने संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला याची माहिती दिली परंतु दीड वर्षापासून कोणीही तांत्रिक दुरुस्ती करणारा आलेला नाही.पिलान्द्री ता.पवनी येथे बूथ नं.314 मध्ये EVM मध्ये बिघाड VVPAD मध्ये एरर आल्याने मतदान बंद.आतेगाव बुथ न. ७ ता. साकोली पहिल्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड दुसरी लावली तिथेही बिगाड मतदान बंद आहे.गोंदिया विधानसभा मतदारसंघातील दागोटोला मतदान केंद्रावरही मशीनमध्ये बिघाड आलेला आहे.खैरणा ता.लाखांदूर,डोकेसरंडी येथे EVM मशीन मध्ये बिघाड आला असून अद्यापही काहीही व्यवस्था झालेली नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...