
सविस्तर असे की, सध्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी दोन्ही जिल्ह्यात सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार मधुकर कुकडे यांनी विजय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अनिल देशमुख हे प्रचार दौऱ्यावर आहेत. ते पुढील प्रचारासाठी तिरोड्याच्या दिशेने जात असताना बिरसी फाट्यानजीक एका अपघातातील जखमी आढळले. त्त्यांना अपघातग्रस्त वाहनातून काढून उपचारासाठी श्री पवार आणि देशमुख यांनी आपल्या वाहनाने तिरोडा येथे उपचारासाठी रवाना केले.
त्यानंतर त्यांनी तिरोडा येथे आयोजित प्रचार सभेत उपस्थित मतदारांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment