Saturday 19 May 2018

क्यूबा एअरलाइन्सचे विमान उड्डान घेताच कोसळले; 104 जणांचा मृत्यू




हवाना(वृत्तसंस्था),दि.19 – क्यूबाच्या सरकारी एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी रात्री उड्डान घेताच कोसळले. या भीषण अपघातात 104 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी हवाना येथील जोस मार्ती एअरपोर्टवर विमानाने उड्डान भरताच डुलकी घेतली आणि शेतात प्लेन क्रॅश झाले. या फ्लाइटमध्ये 104 प्रवासी आणि 6 चालक दल प्रवास करत होते. त्यापैकी फक्त 3 जण वाचले असून इतर 3 जणांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे. बोइंग 737 ने हवानाहून होलगुइनसाठी उड्डान घेतली होती. त्याचवेळी अचानक विमान शेतात कोसळले आणि काळोखाचे वादळ निर्माण झाले.  प्लेन क्रॅश झाल्याची माहिती राष्ट्रपती मिग्वेल डियाज-कॅनल यांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, विमानाची अवस्था पाहून भावनिक प्रतिक्रिया दिली.
मेक्सिकोच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, विमानाने उड्डान घेतल्यानंतर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि विमान थेट जमीनीवर आदळले. हे विमान 1979 मध्ये बनवण्यात आले होते. मेक्सिकन कंपनी दामोज एअरोलाइन्सने क्यूबाची सरकारी विमान कंपनी क्यूबन डी एव्हिएशनला ते भाड्याने दिले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...