बिलोली, दि.12 - अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतीने बुधवारी दि 16 रोजी कुंडलवाडी येथे क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 887 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बिलोली ते कुंडलवाडी येथे मोटारसायकल रँली दुपारी २ वाजता काढण्यात येणार असून, त्यात जाहीर सभेचेही आयोजन कै.के रामलू मंगल कार्यालय येथे सां 6.00 वा करण्यात आले आहे.
या जयंती सोहळ्याचे उद्घाटन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते होणार असून, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर यांनी अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, राम पाटील रातोळीकर, विठ्ठल ताकबिडे,शिवा संघटना जिल्हाअध्यक्ष संभाजी बुढ्ढे, संजय बेळगे, लक्ष्मणराव ठक्करवाड, संजय कोठाळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य उपस्थित राहणार आहेत. कुंडलवाडीचे उपनगराध्यक्ष डॉ विठ्ठलराव कुडमुलवार स्वागताध्यक्ष आहेत तर जयंती मंडळाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पा भाले राहतील सदरील कार्यक्रम यशस्वीतेची जबाबदारी तालुका अध्यक्ष महेश पा हांडे, तालुका अध्यक्ष शिवा विद्यार्थी आघाडी मनोहर वसमते, शिवाजी पा चंदनकर त्र्यंबक पा सावळीकर, व संतोष पा शिवशेट्टे व्यकट कुरे,शिवा शिवशेट्टे,परशुराम मगरूले,व्यकट भोगाजे,राजु बावने,विठ्ठल शिवपोनोर, अनुप डोनगावकर,राजु खरबाले, यांच्यावर सोपविण्यात आली आहे तरी या जयंती सोहळ्याला परिसरातील जनतेने उपस्थित रहावे अशी आवाहन जयंती मंडळाने केली आहे.

No comments:
Post a Comment