Thursday 31 May 2018

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई,दि.31: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालंय. पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळतेय. वयाच्या 67 व्या वर्षी फुंडकर यांचे निधन झाले.आज पहाटे चार वाजेच्‍या दम्‍यान पांडुरंग फुंडकर यांची तब्‍येत बिघडली. यावेळी त्‍यांना उलटीही झाली. त्‍यांच्‍या सुरक्षा रक्षकांनी त्‍यांना ताबडतोब सोमय्या रुग्‍णालयात दाखल केले. मात्र रस्‍त्‍यातच त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. फुंडकर यांच्‍या जाण्‍याने भाजपला मोठा धक्‍का बसला आहे.
राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपा वाढवण्याचं काम फुंडकर यांनी केलं. फुंडकर यांच्या निधनाने राज्यात भाजपा रुजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होतेय. कृषीमंत्री म्हणून फुंडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहून काम  करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला ग्रामीण भागापर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब नावानं ओळखले जाणाऱ्या फुंडकर यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये काम केलंय. याशिवाय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षदेखील राहिले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...