Monday 28 May 2018

फेरमतदानाशिवाय मतमोजणी करू नये- खा. प्रफुल्ल पटेल

गोंदिया,दि.28- राज्यात ईव्हीएम मशिन्स असताना सुरत वरून ईव्हीेएम मशिन्स आणण्यात आल्या. भंडारा गोंदिया  लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेदरम्यान प्रत्येत मतदार संघातील 60-65 मशिन्स दोषनिर्माण होऊन बंद पडल्या. प्रशासनाने दिलेले कारण खरे असेल तर देशातील निवडणुका ह्या हास्यास्पद होतील, या सदोष प्रणालीमुले ज्या मतदान केंद्रावर मशिन्स बंद पडल्या त्या केंद्रावरील फेरदान होईपर्यंत देशात कोठेही मतमोजणी आणि निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येऊ नये, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले गोंदिया येथे आज केले आहे..
नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज भंडारागोंदिया लोकसभा मतदार संघात सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. मतदानाच्या प्रथम टप्प्यातच अनेक केंद्रावर इव्हीएम मशिन्स मध्येबिघाड निर्माण झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. खासदार प्रफुल्ल पटेल यांना यावर जोरदार आक्षेप नोंदवून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय देशातील इतर कोणत्याही निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येउ नये, अशी मागणी त्यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे.
 यापूर्वी राज्यात ईव्हीएम मशिन्, पुरेशा प्रमामात असताना गुजरात मधून आणखी मशिन्स आणण्यावर श्री. पटेल यांनी आक्षेप घेतला होता. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशिन्स सदोष निघून मतदान प्रक्रिया बंद पडणे, हे संशयास्पद आहे. प्रत्येत मतदारसंघात 60-65 एवढ्या मोठ्या मशिन्स बिघतातच कशा असा सवाल त्यानी उपस्थित केला आहे.एकट्या गोंदिया मतदार ,संघातील 34 ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबली आहे. या मशिन्सच्या तपासणीसाठी आलेल्या आयोगाच्या अभियंत्यांनी तापानातील वाढ ही मशिन्सच्या बंद पडण्यामागचे ाकारण असल्याचे सांगितले. देशातील अनेक भागात विशेषतः लोकसभेच्या निवडणुका या उन्हाळ्याच्या दिवसातच होतात. त्यामुळे अभियंत्यांचे हे विधान हास्यास्पद असून त्यांचे कारण खरे मानल्यास देशातील निवडणुकींमध्ये या मशिन्स वापरणे ॉ, हे धाैकादायक आहे. सार्वत्रिक निवडणुकांमुळे देशातील लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे निवडणुका या पारदर्शक वातावरणात होणे गरजेचे आहे. प्रगत देशात अगदी जेथे या मशिन्सचा यापूर्वी वापर होत होता, तेथे या मशिन्सच्या वापरावर बंदी आली आहे. याशिवाय  भारतात सुद्धा भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष इव्हीएमच्या वापराच्या विरोधात आहेत. अशावेळी सत्ताधारी आणि आयोगाच या मशिन्ससाठी असलेला आग्रह न समजण्यासारखा आहे. आज झालेल्या मतदान प्रक्रियेतील सर्व मतांच्या चिठ्ठ्य़ा मोजण्य़ाच याव्या, असे ही ते म्हणाले. या निवडणुकीतील फेरमतदान लवकरात लवकर घेण्यात यावे, तोपर्यंत देशात कोठेही मतमोजणी वा निकाल जाहिर  करण्यात येऊ नये,अशी मागणी श्री. पटेल यांनी केली आहे. निवडणुक निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारींकडे केलेले दुर्लक्ष सुध्दा चिंतेची बाब आहे. थेय निवडणुकांच्या माध्यमातूनच लोकशाही बळकट होत असते. परिणामी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हद्दपार करून मतपत्रिकांवरच निवडणुका घेण्यात याव्या, असे ही ते म्हणाले.



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...