Monday 28 May 2018

भंडारा-गोंदिया मतदारसंघात ३०वर मशिन्समध्ये बिघाड


पहिल्याच टप्प्यात दोष निर्माण झाल्याने विरोधकांच्या शंका खऱ्या ठरण्याची शक्यता

गोंदिया,दि.२८- देशात इव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला घेऊन सर्व विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपाला आज होणाèया भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत बळकटी मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरवात होताच तिरोडा-गोरेगाव मतदार संघातील ३० तर मोरगाव अर्जूनी मतदार संघातील इटखेडा आणि खामखुर्रा मतदान केंद्रावरील मशिन केवळ दोन मतदानानंतर बिघडले. परिमाणी, विरोधी पक्षांनी निवडणुकीआधी व्यक्त केलेल्या शंका प्रत्यक्षात उतरत असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर असे की, आज भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या मतदानापूर्वी या निवडणुकीत भाग घेणाèया राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी थेट ईव्हीएमलाच टार्गेट केले होते. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तर सुरतवरून आयात केलेल्या इव्हीएमवर जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र, सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाने हे आक्षेप धुडकावून लावले होते. भाजपच्या वतीने विरोधी पक्षावर पराजयाच्या भीतीने आक्षेप होत असल्याचा प्रचार केला होता. एवढेच नाही तर शिवसेनेने भाजपच्या नेत्यावर साम,दाम,दंड, भेद या नीतीचा वापर करून निवडणूक qजका असे वक्तव्य केल्याची तक्रारच केली होती. हे येथे उल्लेखनीय.
प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. ईव्हीएम मशिन्सच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमादरम्यान सुद्धा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. व्हीव्हीपॅट मतदानाच्या ट्रायलमध्ये  झालेले मतदान, मतमोजणी आणि मतदानाच्या पावत्यांची आकडेवारीमध्ये तफावत आल्याचे समोर आले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने तापमानात वाढ झाल्याने या मशिन्सच्या परफार्मन्सवर प्रभाव पडल्याचे मान्य केले होते. मात्र, आज मतदानाच्या वेळी सामान्य तापमान असल्याने अधिकाèयांनी दिलेला तर्क येथे लागू होत नाही. यावरून आज होणाèया मतदानाच्या विश्वासाहर्तेवर विरोधी पक्षांनी घेतलेली हरकत महत्त्वाची ठरू पाहत आहे.
आज प्रत्यक्ष मतदानाला सुरवात होताच तिरोडा- गोरेगाव मतदार संघातील महालगाव मतदान केंद्रासह ३० केंद्रावरील मतदान यंत्र मतदानापूर्वीच बिघडले. तर अर्जूनी मोरगाव मतदार संघातील इटखेडा आणि खामखुर्रा मतदान केंद्रावरील ईव्हीएम केवळ २ मतदानानंतर बंद पडले. अजून मतदानाची वेळ संपण्यास बराच कालावधी असून तापमानातसुद्धा वाढ होण्याची शक्यता असल्याने या ईव्हीएम मशिन्स संशयाच्या  भोवèयात येत आहेत. परिणामी, सदर निवडणूक निःपक्ष होण्याला घेतलेल्या आक्षेपांचे वजन वाढले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...