Friday 25 May 2018

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार- प्रधान


gst is one way to control fuel price hike says petroleum minister dharmendra pradhan | पेट्रोल-डिझेल दरवाढीतून सर्वसामान्यांची होणार सुटका?, धर्मेंद्र प्रधानांचे संकेत
नवी दिल्ली,दि.25 - गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून जनतेची लवकरच सुटका होईल, असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे. इंधन दरवाढीपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होऊ शकते. दरवाढ कमी करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून कार्य सुरू आहे, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत यावेळी प्रधान यांनी दिले आहेत.

गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे जनतेचा रोष वाढत चालल्याचे पाहून मोदी सरकारही हादरले आहे. डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या परिस्थितीतून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान दिलं आहे.
प्रधान म्हणाले पुढे की, या परिस्थितीतून मार्ग निघेल, याचा मला संपूर्ण विश्वास
 आहे. ज्याद्वारे मध्यम वर्गीय व सर्वसामान्यांना इंधर दरवाढीतून सुटका मिळेल. यासाठी सरकारचं आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरदेखील नजर असून यातून काही-न्-काही मार्ग नक्की काढण्यात येईल. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...