Tuesday 22 May 2018

नागपुरात बोनसच्या आमिषाला बळी पडल्याने २४ लाखाचा फटका


नागपूर,दि.22 : विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांला सायबर गुन्हेगारांनी २४ लाख ३८ हजाराने गंडविले. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी या महिलेची लूट करत होता.  तरुणक्रांती महापात्रा (६३) रा. रामनगर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.
महापात्रा या सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. पोलीस सूत्रानुसार, महापात्रा यांनी काही दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेची विमा पॉलिसी काढली होती. २१ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. एचडीएफसीचा अधिकारी बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या पॉलिसीवर अतिरिक्त बोनस देण्याचे त्याने आमिष दाखविले. त्याने महापात्रा यांना सांगितले की, २८ हजार रुपये जमा केल्यावर त्यांना दीड लाख रुपयाचा अतिरिक्त बोनस मिळेल. केवळ दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या पॉलिसीवर दीड लाख रुपये बोनस मिळणार असल्याच्या आमिषात त्या आल्या. त्यामुळे त्यांनी आरोपीने सांगितल्यानुसार पैसे जमा केले. त्यानंतर महापात्रा यांना वेगवेगळ्या नंबरवरून महिला-पुरुष फोन करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत राहिले. बोनसचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महापात्रा यांनीही ते सांगत त्या खात्यात पैसे जमा करीत राहिल्या. यासाठी त्यांनी दोनवेळा कर्जही घेतले. एप्रिल महिन्यात त्यांनी आणखी पैसे जमा करण्यास असमर्थता दर्शविली. यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले असून इतके मोठी रक्कम कुठून आली, याबाबत ते विचारत आहेत तसेच कारवाईची धमकीही देत आहेत. तुमचे नाव सांगितले तर ते तुम्हालाही विचारपूस करण्यासाठी बोलावतील. तुमचे वय पाहता आम्ही तुमचे नाव सांगितले नाही, असे म्हणत गुन्हे शाखेचे पोलीस पाच लाख रुपये मागत आहेत. त्यांच्याकडे साडेतीन लाख रुपये आहेत. दीड लाख रुपये तुम्ही द्या, असे आरोपीने सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर महापात्रा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
महापात्रा यांची मुले विदेशात राहतात. त्यांची मुलगी अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी तिला आपबिती सांगितली. मुलीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...