Thursday 31 May 2018

ईव्हीएमचा घोळ आणि दुष्काळी परिस्थितीमुळे भाजपचा पराभव- देवेंद्र फडणवीस

ईव्हीएमसंबंधी भाजपच्याही तक्रारी; निवडणुक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे.

अपने ही कैबिनेट मंत्री के कारण फंस गए सीएम देवेंद्र फडणवीसमुंबई,दि.31- जेव्हा जेव्हा इलेक्ट्रानिक मतदान यंत्रामध्ये घोळ होतो, तेव्हा तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसतो. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कधी नव्हे एवढा भीषण दुष्काळ पडला. या दोन्ही बाबी भाजपच्या विरोधात गेल्याने येथील पार पडलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आमचा पराभव झाला. मात्र, 2019 मध्ये तेथे आमच्या पक्षाचा उमेदवार भरघोष मतांनी निवडून येईल याची मला खात्री आहे, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
 मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देताना  बोलत होते. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे सर्वाधिक आमदार असताना गोंदियात झालेला पराभव हा विदर्भातील निकालावर परिणाम पडणार का? या प्रश्नाच्या उत्तराला टोलवताना मुख्यमंत्री म्हणाले की, ईव्हीएम मशिन्स संबंधी आमच्याही तक्रारी आहेत. भाजपचा मतदार हा सुशिक्षित असून तो मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात मतदानाला येतो. त्यामुळे मतदानाला सुरवात झाल्यावर त्याचा थेट परिणाम भाजपच्या मतांवर पडला. कारण एकदा परत गेलेला आमचा मतदार पुन्हा केंद्रावर येत नसतो. याशिवाय यावर्षी या दोन्ही जिल्ह्यात कधी नव्हे एवढा भीषण दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकरी-शेतमजूर काहीशा नाराज आहे. त्यामुळे आम्हाला तेथे फटका बसला. परंतु, तेथे परिस्थिती मात्र आम्हालाच अनुकूल आहे. यामुळे आगामी 2019च्या निवडणुकीत आमचा उमेदवार तेथे भरघोष मतांनी निवडून येणार याची मला खात्री असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...