Friday, 25 May 2018

पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात कॉंग्रेस कमिटीतर्फे निदर्शने

भंडारा,दि.25 : राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाभरात नागरिकांनी या दरवाढीच्या संदर्भात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त कोल असून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे.
या संदर्भात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढलेल्या असून त्यामुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक लूट होत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर हे आज पर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त दर आहेत. वाढलेल्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या असून त्यामुळे महागाई आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. शेतकरी मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहेत.
पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमती कमी करून सामान्य जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. परिणामी शासनाला जनतेच्या रोषाला सामोर जावे लागेल.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, दिपक गजभिये, धनराज साठवणे, शंकर राऊत, आणिक जमा पटेल, अजय गडकरी, अवैस पटेल, सुनील गिºहेपुंजे, मंगेश हुमणे, प्रशांत देशकर, प्रा.टी.डी. मारबते, संजय वरगनटीवार, प्रकाश डोनेकर,सुकराम देशकर, रोशन दहेकर, विनय बागडे, सचिन गिरहेपुंजे, नाहीद परवेज,अंकुश वंजारी, हेमंत मलेवार,हरिराम निमकर, भोलाराम साठवणे, प्रदीप वाडीभस्मे, गणेश लीमजे मोहाडी,जिवन भजनकर, जागेशवर बडगे इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...